वैराग – कोरफळे येथील द्राक्ष बागेची घटना ताजी असतानाच इर्ले येथील एका शेतकऱ्याची सागवान झाडे अज्ञात इसमाने मोडून टाकल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.एकाच आठवड्यात दोन घटना घडल्यामुळे विकृत वृत्ती वाढू लागल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इर्ले येथील गट क्रमांक तीनशे आठ पैकी एक मध्ये उत्कर्ष आनंदकुमार डुरे यांची चार एकर जमीन आहे यामध्ये दीड वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रावर ती सागवान झाडांची लागण करण्यात आली आहे.
सुमारे सहाशे झाडे असलेल्या या शेतातील अज्ञात इसमाने अठरा झाडे मोडून टाकून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
 
	    	 
                                




















 
                