प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या फौजदार विक्रमसिंह रजपूत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद झाले आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. तक्रारदाराच्या मित्रावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार रजपूत यांच्याकडे आहे. यापूर्वी तक्रारदाराच्या मित्रावर ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. यानुसार सीआरपीसी 107 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार रजपूत याने स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने तक्रारदाराकडे दोन लाखाची लाच मागितली. त्यानंतर एक लाखावर तडजोड केली. पडताळणीत हे निष्पन्न झाल्यानंतर फौजदार रजपूत याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीष सोनवणे, नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, नरोटे , जाधव, पोलीस शिपाई किणगी, श्याम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...