दक्षिण सोलापूरातील वडापूर गावचे माजी सरपंच राजश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवली होती हे सिद्ध झाले असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सदर बझार पोलिसांना दिले होते त्यानुसार नायब तहसिलदार राजा भंडारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सन २०२०-२०२१ ग्रामपंचायत वडापूर सार्वत्रिक निवडणुकीत तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांचेकडै महादेव कोळीचे दि २७/०५/१९९१ रोजीचे NO/MAG/CGT/SR/२५९/९१ असे खोटे व बनावट अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला जमा करून शासनाची फसवणुक केली असल्याचे अनु. जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग पुणे यांचा आंदेश क्र ३१३४/२०२१/१७३१दि २८/०४/२०२२ यानुसार निष्पन्न झाल्याने वरील आरोपीविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे. राजश्री औदुंबर कोळी यांनी सन 2020 – 21 मध्ये ग्रामपंचायत वडापुर येथील सार्वत्रिक निवडणूक अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली होती.
सदर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्राबाबत बिपिन वसंतराव पाटील यांनी अनुसूचित जातीचा जमाती प्रमाणपत्र समितीकडे राजश्री कोळी यांनी जोडलेला अनुसूचित जाती जमातीचा दाखला बनावट असल्याचे तक्रार केली होती. पाटील यांनी तक्रारी सोबत मूळ माहेरीकडील गाव होटगी स्टेशन असताना कोळी यांनी पंढरपूर तहसिलदार यांच्या कार्यालयातील बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या आधारे वडापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस दक्षता पथकाची संलग्न असलेल्या संशोधन अधिकारी यांनी अर्जदार कोळी महादेव अनुसूचित जमातीचे नसताना देखील कोळी महादेव जमातीचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेण्याचा प्रयत्न यांनी केला हे सिध्द झाले.