सोलापूर : महार वतन जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
महार वतनी जमीन घोटाळा प्रकरण हे गंभीर आहे. याप्रकरणी तातडीने पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे , जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड , शहर अध्यक्ष देवा उघडे , जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखांब, महेंद्र कांबळे, नितीन क्षीरसागर, सौरव लोंढे , रोहन बनसोडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

















