सोलापूर लग्नात मानपान दिला नाही आम्ही मागेल तेवढा हुंडा दिला नाही म्हणून विवाहतेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत सासर खासबाग गल्ली,हसापूर रोड ता. अक्कलकोट येथे घटना घडली आहे. याबाबत श्रीदेवी नागराज स्वामी ( वय २७ खासबाग गल्ली, हसापूर रोड ता. अक्कलकोट सोलापूर ) यांनी एम आय डी सी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पती नागराज कल्लया स्वामी, नणंद सविता राजेश हणमगाव,नणंद वैशाली दयानंद स्वामी, दीर श्रीशैल स्वामी,नणंद ज्योती ओमप्रकाश घेरडी, नणंदचे पती ओमप्रकाश घेरडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता श्रीदेवी स्वामीला लग्नानंतर पाच ते सहा महिन्यानंतरच आरोपी नागराज स्वामी व त्याचे नातेवाईकांनी तुझ्या आईने आमच्या मनाप्रमाणे हुंडा दिला नाही, लग्नात मानपान दिला नाही.
पती नागराज याला सोडून दे नाहीतर तुला अशा प्रकारे त्रास देणार, व्यवस्थित नोंदविणार नाही असे म्हणून जाचहाट करून मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे. तसेच शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे. तू जर परत इथे आले तर तुला बघ काय करतो असे फिर्यादीत नमूद आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत.