सोलापूर : घराजवळ सायकल चालवत असताना रस्त्यातील खड्ड्यात सायलक गेल्याने खाली पडून 13 वर्षाचा बालक जखमी झाला. हा प्रकार मजरेवाडीतील लोकमान्य नगरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडला.
धनराज लक्ष्मण धडके (वय 13 , रा. लोकमान्य नगर) असे बालकाचे नाव आहे. धनराज हा सोमवारी रात्री आठच्या सुमारास राहत्या घराजवळ सायकल खेळत होता. त्यावेळी सायकल रस्त्यातील खड्यात जाऊन तो खाली पडला.
यात धनराजच्या डोक्याला जखम झाली. खासगी रुग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची नोंद झाली आहे.