सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी २०२३-२४ या वर्षी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन केले आहे. या समायोजनात शाळा बंद झालेले शिक्षकांचे समुपदेशन करणे गरजेचे होते. त्यांचे नांव वगळून समायोजन केले आहे आणि ज्या शाळे मध्ये शिक्षक अतिरिक्त झाले होते .त्यांना वगळून संघटनेच्या दबावाखाली दुसऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे.
तसेच गेल्या वर्षी सुद्धा याच प्रकारे मैदर्गी मुलींच्या शाळेतील अतिरिक्त झालेल्या शिक्षिका सदर शाळेतून बदली करून दुसऱ्या शाळेवर जाणेसाठी आदेश घेवून गेले होते .त्यानंतर रात्री ७.०० ते ८.०० वाजता संबंधीत शिक्षिकेला बोलावून घेवून त्यांना संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांचा नांव त्या यादीतून वगळून त्याच शाळेतील शेवट नंबरचे शिक्षिका यांचे बदली करण्यात आले. त्या शिक्षिकांना मुख्याध्यापक कार्यमुक्त केले नसताना सुद्धा त्या शिक्षिकेनी माझे बदली झाले आहे. मी त्या शाळेवर हजर होण्यासाठी जात आहे असे मुख्याध्यापकांना पत्र देऊन गेले.
हा प्रकार प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना सदर मुख्याध्यापक पत्र देऊन कळवून सुद्धा त्यावर कारवाई केले नाही. या शाळेतून कार्यमुक्त आदेश नसताना सदर शिक्षिकेनी समुपदेशन झालेल्या शाळेवर कसे हजर झाले ? गेल्या वर्षीसुद्धा याच प्रकारचे प्रतिनियुक्त्या केले होते. त्या चौकशीचे फाईल अजूनही प्रलंबित आहे.
तरी या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अन्यथा मागसवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.


















