सोलापूर – स्वायत्त ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अविष्कार २०२५-२६ या संशोधना आधारित पोस्टर व प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. यात विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना सादर केल्या. विविध सहा विभागातून जवळजवळ ५० पेक्षा जास्त प्रकल्प व त्याचे सादरीकरण झाले.
ह्युमॅनिटी लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स यामधून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्रथमेश रामपोगु व नागेश कोंडाबत्तीन, कॉमर्स मॅनेजमेंट आणि लॉ या प्रकारांमध्ये शोएब इनामदार व मोहम्मद अरीवाले तसेच प्युअर सायन्स आर्यन मस्के व जय माशाळ एग्रीकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री पारस राजगिरी व समीक्षा कुलकर्णी इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी वैष्णवी गोनसग व तनिष्क माने आणि मेडिसिन आणि फार्मसी या विभागात समर्थ हक्कॆ व अंजली माने या विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन व संचालन प्रा. आर.डी. मैत्री, प्रा. एस.जे. लिगाडे, प्रा. एस.एन. उपाध्ये, प्रा. एस.के. कोनापूरे व प्रा. रेणुका होर्तीकर यांनी केले. या प्रसंगी मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. एस. बी. गदवाल, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा. एस.व्ही. कुलकर्णी, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. टी. डी. मसलेकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभाप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर व प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.
आविष्कार-२०२५-२६ या स्पर्धेचे समन्वयक प्रा. श्रीशैल बिराजदार यांनी सर्वांचे स्वागत केले. स्पर्धेच्या परीक्षणासाठी डॉ. एस. बी. गदवाल, डॉ. आर. व्ही. दरेकर, प्रा. एस.व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. आर. साखरे, प्रा. ए.एस. लिगाडे, प्रा. आर. बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम.ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री एस.ए. पाटील, ट्रस्टी शिवानंद पाटील यांनी अभिनंदन केले.
*फोटो ओळी: आविष्कार-२०२५-२६ याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम.ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. पोतदार डिपार्टमेंट विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी वर्ग*






















