पंढरपूर – पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सहा सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी संपुर्ण सोलापुर जिल्हयातुन हददपार करण्यात आल्याची माहिती येथील शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.
हद्दपारीच्या या कारवाई संदर्भात माहिती देताना पोलिस निरीक्षक घोडके यांनी सांगितले की, शहर पोलीस ठाणे हददीतील शरीरारविषयीचे गंभीर गुन्हे करणारे टोळीतील सराईत गुन्हेगार आणि टोळी प्रमुख राजेंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे, (रा. हणुमान मैदानाजवळ, जुन्या कोर्टाचे पाठीमागे, पंढरपूर ) याच्यासह दर्शन उर्फ कौस्तुभ संतोष बंडगर ( रा. धुंडा महाराज मठासमोर, पंढरपुर ) , पवन अनिल आधटराव ( रा. मटण मार्केटजवळ पंढरपुर ) , कार्तिक नागेश सुरवसे ( रा.धुंडा महाराज मठासमोर पंढरपुर ) अक्षय हरीभाउ गवळी उर्फ अक्षय जुमाळे ( रा. हनुमान मैदान पंढरपुर ), ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव (रा. गांविदपुरा. पंढरपुर सध्या रा. शिवाजीनगर, जळगाव ) या सहा जणांविरूध्द दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन हददपारीचे कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला होता.
दरम्यान अहवाला नुसार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन त्या बाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेकडे सादर केला होता. जिल्हा प्रमुखांच्या आदेशान्वये राजेंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे, (टोळी प्रमुख), दर्शन उर्फ कौस्तुभसंतोष बंडगर (टोळी सदस्य) पवन अनिल आधटराव (टोळी सदस्य), कार्तिक नागेश सुरवसे (टोळी सदस्य), अक्षय हरीभाउ गवळी उर्फ अक्षय जुमाळे आणि ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव यांना ताब्यात घेवून संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठीच्या हददपारीचे आदेश बजावण्यात आल्याचेही घोडके यांनी सांगितले.
——————————
एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार
दरम्यान हद्दपारीच्या या आदेशान्वये वरील टोळी प्रमुख व इतर सदस्यांना संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन एक वर्ष कालावधीकरीता हददपार करण्यात आले असुन यापुढेही पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील दोन पेक्षा जास्त दाखल गुन्हयातील अवैध वाळुचोरी तसेच शरीराविषयी गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारां हदपार करणेसंदर्भातील कामकाज सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.
—————————
यांनी पार पाडली हद्दपारीच्या ही कामगिरी
दरम्यान वरील हद्दपारीची कामगीरी ही सर्व वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ, कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच पोहवा सिरमा गोडसे, प्रसाद औटी, विठठल विभुते, शहाजी मंडले, कपिल माने, बजरंग बिचकुले, दिपक नवले, पोकॉ दिगंबर भंडरवाड , पोकॉ अनिस शेख यांनी केली आहे.



























