हिंगोली – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली व शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 01/12/2025 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथून सदरील मोटारसायकल रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ देवेंद्र जायभाये, प्राचार्य डॉ रामदास मुकटे, उप प्राचार्य बाळासाहेब क्षीरसागर, एआरटी नोडल अधिकारी डॉ मनीष मुपकलवार, डॉ बालाजी भाकरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी, प्रा डॉ माणिक डोखळे, डॉ श्रीराम कऱ्हाळे, प्रा आशिष इंगळे, प्रा संजय चव्हाण, पीएसआय श्री घुमणर व विविध महाविद्यालयाचे रेड रिबन क्लबचे समन्वयक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी प्रास्ताविक करून जागतिक एड्स दिनानिमित्त पुढील पंधरा दिवसांतील नियोजित कार्यक्रमा बद्दल माहिती देऊन एड्स दिनाचे महत्व व यामध्ये रेड रिबन क्लबचे योगदान कसे असेल याविषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस यांनी उपस्थितांना शपथ दिली.
सदरील रॅली शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथून सुरू होऊन कोथळज रोड मार्गे अग्रसेन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड मार्गे पोष्ट ऑफीस, शिवाजी महाराज चौक अशी शहरातील प्रमुख मार्गावरून निघून सामान्य रुग्णालयात समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा किशोर इंगोले यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री संजय पवार , टिना कुंदनानी, आशिष पाटील, बालाजी चाफाकानडे, अब्दुल मुजीब, नितीन राठोड, देवानंद रायबोले, महानंदा साबळे, स्वाती चोपडे, लक्ष्मी वाठोरे, नम्रता भगत, संदीप सोळुंके, सुभाष मुदिराज, राजू पुंडगे, प्रसाद कुलकर्णी , रवी घुगे, बालाजी उबाळे, शीला रणवीर विनीत उबाळे, सेतू एनजीओ, विहान एनजीओ यांचे कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


























