पुणे – भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (ICAR–CIRCOT) यांच्या RKVY RAFTAAR कृषी व्यवसाय इन्क्युबेटर (ABI) मार्फत किसान अॅग्री शो 2025, मोशी पुणे मध्ये लक्षणीय सहभाग नोंदविण्यात आला. हा भव्य कृषी मेळावा 10 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
या प्रदर्शनात ICAR-CIRCOT RKVY RAFTAAR कार्यक्रमांतर्गत समर्थित एकूण 28 नाविन्यपूर्ण कृषी व संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. डॉ. अशोक कुमार भरीमल्ला, प्रधान शास्त्रज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्टार्टअप्सनी शेतकरी, उद्योग प्रतिनिधी, संशोधक व धोरणकर्त्यांसमोर आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उत्पादने, सेवा व नवकल्पना सादर केल्या.
या कालावधीत स्टार्टअप्सनी 75,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला, सुमारे 12 लाख रुपयांचे व्यावसायिक लीड्स निर्माण केले, तसेच B2B, B2G आणि B2C संबंध प्रस्थापित केले. याशिवाय कृषी स्टार्टअप परिसंस्थेतील विविध भागधारकांशी महत्त्वपूर्ण संपर्क साधण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. एस. के. शुक्ला, संचालक, ICAR-CIRCOT तसेच श्री. आबासाहेब हराळ, सदस्य, ICAR-CIRCOT RAFTAAR इन्क्युबेशन समिती तसेच श्री रवींद्र सबनीस, तहसीलदार तथा सहाय्यक प्राध्यापक रामेती यांनी इन्क्युबेशन पॅव्हेलियनला भेट देऊन सर्व 28 स्टार्टअप्सशी सविस्तर संवाद साधला. त्यांनी प्रत्येक स्टार्टअपच्या प्रगतीचा आढावा घेतला, व्यापारीकरणाच्या धोरणांवर चर्चा केली आणि स्टार्टअप्सच्या वाढीचे, नवोन्मेषाचे व उद्योजकीय प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उद्योजकांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आपली उपाययोजना अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी प्रेरणा मिळाली.
या प्रदर्शनात प्रकल्प सह–प्रधान संशोधक (Co–PI) म्हणून श्रीमती प्राची म्हात्रे, डॉ. मनोज कुमार महावर, डॉ. शेषराव कौतकर आणि डॉ. ज्योती ढाकणे लाड यांचा सक्रिय सहभाग लाभला. त्यांनी सातत्याने स्टार्टअप्सशी संवाद साधून तांत्रिक व धोरणात्मक मार्गदर्शन केले आणि उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान स्टार्टअप्सच्या सहभागाचे प्रभावी नियोजन व समन्वय श्री. उदय कोरे आणि श्री. अमोल निंबाळकर व्यवस्थापनामध्ये स्टार्टअप्सना मदत केली.
किसान अॅग्री शो 2025 मधील ICAR-CIRCOT RKVY RAFTAAR स्टार्टअप्सचा सहभाग हा नेटवर्किंग, बाजारपेठेतील संधी आणि भागधारकांशी संवाद साधण्यासाठी एक प्रभावी मंच ठरला. या माध्यमातून कृषी उद्योजकता, नवोन्मेष आणि शाश्वत कृषी व्यवसाय विकासासाठी ICAR-CIRCOT ची बांधिलकी अधिक दृढ झाली.


























