करकंब – विद्या विकास मंदिर उंबरे पागेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सोलापूर यांचेवतीने प्राथमिक शाळांमधील कलेबरोबरच शरीरही निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी आणि खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी लंगडी, खो,खो, कब्बडी, बुद्धीबळ आदी स्पर्धांचे १ली ते ५ वी,६वी ते ८वी या दोन गटात आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जि.प.प्रा.शाळा जळोलीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात मुले,मुली लंगडी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने बीटस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.लंगडी लहान गटात मुले मुली द्वितीय क्रमांक,खो-खो मोठा गट द्वितीय क्रमांक पटकाविला.वैयक्तिक स्पर्धेत पूर्वा मनोज नरसाळे,संघर्ष केशव नरसाळे यांनी धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.उंबरे केंद्रातील सर्व शाळांनी उत्साही वातावरणात सहभागी होऊन खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले.
यावेळी या स्पर्धांना पंढरपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांनी भेट देत सुंदर नियोजनबद्ध क्रिडा स्पर्धेचे कौतुक करत या स्पर्धेमधून हेच विद्यार्थी भविष्यात क्रिडा नेतृत्व करतील त्यासाठी प्राथमिक शिक्षक अधिक कष्ट घेत आहेत याचा अभिमान वाटतो असे मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्या विकास मंदिर उंबरे पागेचे मुख्याध्यापक शहाजी पाटील,उंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख पा.वा.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुंदर आयोजन करण्यात आले होते.
केंद्रातील सर्व शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जळोली शाळेच्या सर्व शिक्षकांनी अधिक परिश्रम घेतले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत नरसाळे यांनीही भेट दिली विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असताना सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक अनिल जगताप, सहकारी शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे,जयवंत कापसे, नागनाथ गायकवाड, सिध्देश्वर लोंढे,कैलास नरसाळे, बाळासाहेब खांडेकर,शिक्षिका देवकी कलढोणे (दुधाणे) यांनी परिश्रम घेतले.




















