अक्कलकोट – पुण्यात एक प्राव्हेट कंपनीत काम करणारा मुलगा शिंदे शिवसेना पक्षाकडून अक्कलकोट पंचायत समिती सदस्य झाल्याने परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी गावचे सुपुत्र भिमा सोलापुरे यांनी १३५ सलगर पंचायत समिती गणात एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळवून प्रतिस्पर्धी भाजप चे उमेदवार सलगरचे शिवराज बिराजदार यांचा 151 मतांनी पराभव करीत विजयी मिळविला आहे.भीमा सोलापूरे हे पुण्यात प्राव्हेट कंपनीत काम करीत असून नवखा असतानाही स्वतःच्या मिरजगी गावात ४५० तर बोरी उमरगे गावातून १२३ मताची आघाडी घेतली आहे. पुण्यात एक प्राव्हेट कंपनीत काम करणारा मुलगा अक्कलकोट पंचायत समिती सदस्य झाल्याने परिसरात कौतुक होत आहे.
यांच्या विजयासाठी माजी उपसरपंच सिद्धाराम निंबाळ, हावण्णा निंबाळ, सरपंच महादेव निंबाळ, दौलप्पा निंबाळ, राजु जमादार, कर्ण निंबाळ,सुरेश निंबाळ .चंद्रु निंबाळ, सतिश जाधव, विश्वनाथ लोंढे यांच्यासह त्यांचे सर्व मित्र मंडळी परिश्रम घेतले.























