Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापौर व उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत आज विशेष सभा

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोलापूर महानगरपालिकेची पहिली विशेष सभा शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कौन्सिल हॉलमध्ये होणार आहे. या सभेत अडीच वर्षांसाठी महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी राहणार आहेत. आवश्यकतेनुसार निवडणूक प्रक्रिया हात वर करून मतदानाने पार पडणार आहे. 

             मुंबई प्रांतिक महानगरपालिका (महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ तसेच विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेकडील आदेश क्र. नपाप्र/४/कावि/५१/२०२६, दि. २३ जानेवारी २०२६ अन्वये सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोलापूर महानगरपालिकेची पहिली विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या कै. यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात (कौन्सिल हॉल) आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी हे राहणार आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ (१) नुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीत अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार महापौर पद हे अनारक्षित (खुल्या) प्रवर्गासाठी राहणार आहे.

              सोलापूर महानगरपालिकेचे नगरसचिव प्रविण दंतकाळे यांनी याबाबतची कार्यपत्रिका क्र. १ प्रसिद्ध केली आहे. ही कार्यपत्रिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अनुसूची प्रकरण २ अंतर्गत काढण्यात आली आहे. सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठीची नामनिर्देशन पत्रे नगरसचिव कार्यालयात स्वीकारण्यात आली आहेत. सभागृहात उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी शासनमान्य ओळखपत्र तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी तसेच उमेदवारी परत घेण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सभा सुरू झाल्यानंतर नियमांनुसार पार पडणार आहे.पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी हे राहणार आहेत. यावेळी सुरुवातीला अर्ज छाननी, अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. दरम्यान, आवश्यकतेनुसार मतदान हात वर करून घेतले जाणार आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका (महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ मधील नियम ७ (३) नुसार हात वर करून मतदान करण्यात येणार आहे. या सभेसाठी महापालिकेतील कै. यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 महापौर–उपमहापौर निवडणूक उमेदवारी चित्र

 * महापौर पदासाठी उमेदवार :

भाजप : विनायक रामकृष्ण कोंड्याल

शिवसेना (शिंदे गट) : प्रियदर्शन बाळासाहेब साठे

एमआयएम : तौफिक बाबुमियाँ हत्तुरे.

 * उपमहापौर पदासाठी उमेदवार :

भाजप : ज्ञानेश्वरी महेश देवकर

शिवसेना (शिंदे गट) : प्रियदर्शन बाळासाहेब साठे

एमएमएम : आसिफ अहमद पीर अहमद शेख.

Post Views: 103
Previous Post

मुंबई येथे ९ फेब्रुवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन

Next Post

इंद्रजीत पाटील शब्दांगण पुरस्काराने सन्मानित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

इंद्रजीत पाटील शब्दांगण पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

February 8, 2026

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी आज मतदान शांततेत

February 8, 2026

राजर्षी शाहू लाख काॅलेजमध्ये डॉ. जगदाळे मामांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0665364

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697