अकलूज – संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधी साठी आयोजित केलेल्या वीसाव्या भव्य लेझीम स्पर्धेत ग्रामीण मुले गटात कोळेगांव तर शहरी मुली ब गटात संग्रामनगर संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विजय चौक, अकलूज येथे सदरच्या स्पर्धा सुरू आहेत.या स्पर्धेत
ग्रामीण मुले गटात- विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव यांनी प्रथम क्रमांक, श्री संत तुकाराम विद्यालय बोंडलेआणि सदाशिवराव माने विद्यालय माणकी यांनी विभागून द्वितीय क्रमांक व श्री गणेश विद्यालय पिंपळनेर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
शहरी मुली ब गटात- श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर यांनी प्रथम क्रमांक, श्री हनुमान विद्यालय लवंग यांनी द्वितीय क्रमांक व कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या वेळी मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सौ.ऋतुजादेवी मोहिते पाटील, कार्याध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, नूतन नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, दिपकराव खराडे पाटील,प्रदीपराव खराडे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सूर्यकांत शेंडगे, रामभाऊ गायकवाड, आप्पासाहेब मगर यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ५८ संघांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेसाठी सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.स्वागत सचिव संजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, शकील मुलानी, ईलाही बागवान, विशाल दळवी यांनी केले


















