तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतच्या परिपत्रकात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिना’चा जयंती कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश केला आहे. यासाठी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. हरिहर पांडे यांनी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला त्यामुळे महाराष्ट्र शासनाने २७ डिसेंबर २०२३ आणि १८ जानेवारी २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित केले.
या प्रमाणे ता. ५ सप्टेंबर २०२४ रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती कार्यक्रम साजरा करण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्या निर्देशांची शासन स्थरावर अंमलबजावणी करावी करीता अ.भा.महानुभाव परिषद समीती जालना व अंतरवाली सराटी येथील महानुभाव पंथ उपदेशी, वासनिक,साधु ,महंत,यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहंम वायाळ, नायब तहसिलदार विश्वास धर्माधिकारी तहसील अंबड यांना सोमवार ता.5 रोजी निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर अ.भा.महानुभाव परिषद जालना जिल्हा अध्यक्ष महंत श्री. बलदेवराज बाभुळगावकर , महंत कोठी बाबा जालना, कृष्णराव कोठी वाटुर फाटा ,कृष्णमुनी कोठी अंबड , कृष्षराज बाबा साळकर , भारत बाबा भोजने अंबड ,श्रीधर बाबा बिडकर, उध्दव लोंढे, सुभाष कदम, अंतरवाली सराटी येथील सदभक्त श्री. बाबासाहेब दखने, दिलीप दखने, दिगंबर झांजे, आबासाहेब घाडगे,स्वप्नील दखने, सुनील दखने, राहुल कोटंबे, भागवत दखने, बाबासाहेब रोडी,योगेश कोटंबे, मनिष टोपे, यांच्या सह्या आहेत.