जेऊर – समाजातील चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षक करत असतात त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे महत्व असाधारण आसल्याने त्यांचा आदर व सन्मान नेहमी केला पाहिजे असे प्रतिपादन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी यांनी शेटफळ येथील आदर्श शिक्षक महादेव नाईकनवरे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित तीन दिवसीय मंचरी पारायण सोहळा सांगता व नागरी सन्मान कार्यक्रमात बोलताना केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील विठ्ठल पाटील महाराज हे होते.
यावेळी बोलताना विठ्ठल पाटील महाराज म्हणाले की सध्याच्या युगात घरातील जेष्ठ मंडळी ही लोकांना अडचण वाटू लागली आहे परंतु अशाही काळात आपल्या आई-वडिलांची नित्यनेमाने सेवा करणारे त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना मानसन्मान देणारी मुले आहेत आणि हीच खरी आईवडिलांची संपत्ती असते. शेटफळ येथील मधुकर नाईकनवरे व अजित नाईक नरे यांनी आपल्या वडिलांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून या परिसरा पुढे नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
शंभूराजे जगताप म्हणाले की ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे दीपस्तंबासारखे असून त्यांना दीर्घायुष्य लाभावे त्यांचा गौरव सोहळ्याचे साक्षीदार होत असल्याचे आम्हाला समाधान वाटते. जेऊर चे सरपंच पृथ्वीराज पाटील म्हणाले की नाईक नवरे गुरुजी व त्यांच्या परिवाराचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज असून शिक्षणाबरोबरच शेती क्षेत्रामध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र पोळ यांनी केले यावेळी कीर्तनकार विलास सरडे महाराज जगताप महाराज कालठाण चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, दत्तात्रय सरडे केरुजी गव्हाणे सत्यवान लबडे गणेश मोरे व माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिंदे यांनी केले तर आभार बापू महाराज नाईकनवरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला शेलगाव चे सरपंच अमर ठोंबरे ,महापौर केसरी पैलवान विजय गुटाळ, बाजार समितीचे संतोष वारगड माजी संचालक दादासाहेब लबडे सरपंच काकासाहेब लबडे माजी सरपंच पांडुरंग लबडे भुजंग जाधव यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

















