सोलापूर – पार्क स्टेडियम समोरील बसस्टॉप काढल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी निदर्शने आंदोलने करत काढण्यात आलेल्या बसस्टॉपच्या त्या जागेवर श्रद्धांजली वाहण्यात आली.
काही दिवसांपूर्वी पार्कस्टेडियम समोरील बस स्टॉप काढण्यात आले होते, त्याची तीव्र नाराजी सोलापुरातील नागरिकांमधून होऊ लागली होती. आजपर्यंत आपण जागा गायब होणे, शौचालय गायब होणे ऐकले होते आता तर चक्क बसस्टॉपच महापालिकेने गायब केले. महापालिका अधिकारी आयुक्त आणि परिवहन च्या अधिकाऱ्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्या ठिकाणी बस स्टॉप होते त्या जागेवर गुलाबांची उधळण करत तेथे पुष्पगुच्छ ठेवून उदबत्तीने ओवाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. येणाऱ्या काळात एक महिन्यात जर आहे त्या ठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले नाही तर महापालिका अधिकाऱ्यां विरोधात श्रद्धांजली वाहू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, लहू गायकवाड, आबा सावंत, सुरेश जगताप, दत्ता खलाटे, महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, जैनुद्दीन शेख, अभिषेक रामपुरे, आदी शिवसेना व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेला बस सेवा संपवायची आहे का. प्रशासन काय गोंधळ घालतंय याचा साळसूद नाहीय कशाच, येणाऱ्या एक महिन्यात जर बस स्टॉप उभा केली नाही तर शिवसेना व मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करू.
– विनायक महिंद्रकर, मनसे जिल्हाप्रमुख
























