मंगळवेढा – तुम्ही आमचे भांडणात का पडता? असे म्हणाल्याच्या कारणावरुन एका 34 वर्षीय महिलेस घरात घुसून लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी विठ्ठल बाबासाहेब जावीर, यशोदा विठ्ठल जावीर,कृष्णा विठ्ठल जावीर (रा.त्रिमुर्तीनगर,मंगळवेढा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी तिच्या पतीस दारुचे व्यसन असून आरोपी व फिर्यादी हे शेजारी-शेजारी रहावयास आहेत. फिर्यादीचा पती व तिची जाऊ या दोघांचे अनैतिक संबंध असलेबाबत फिर्यादीस माहिती मिळाली होती. त्यामुळे ती तिच्या पतीला व आरोपींना समजावून सांगत होती.
आरोपी हे फिर्यादीवर चिडून होते. दि.21 रोजी रात्री 11 वाजता फिर्यादी ही घरासमोर असताना तिचे पती यांच्याशी तोंडभांड सुरु होते. त्यामुळे शेजारी राहणारे आरोपी हे घरासमोर येवून फिर्यादीस म्हणाले,तू पतीवर सशंय का घेते? म्हणून शिवीगाळी करु लागली.
यावेळी फिर्यादी आरोपींना म्हणाली,आमचे पती-पत्नीचे भांडण सुरु आहे तुम्ही आमच्या भांडणात कशाला पडता? असे म्हणताच वरील आरोपीने घरात जावून लोखंडी गज आणून शिवीगाळी करीत तुला लय मस्ती आली आहे असे म्हणत फिर्यादीच्या उजव्या हातावर,पाठीवर,डाव्या पायावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे केस पकडून एका महिला आरोपीने ढकलून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.



















