वेळापूर – येथे पंढरपूर पुणे रोडवर हॉटेल गरुड जवळ १०:२५ च्या सुमारास स्कुटी गाडी ला मागून स्कोडा कारने धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
अधिक वृत्त असे वेळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्याद अंबादास तायाप्पा पवार यांनी दिली असून यात म्हटले आहे की विझोरी निमगाव पाटी येथील राणूबाई तायप्पा पवार या दिनांक 28 डिसेंबर रोजी रविवारी सकाळी सकाळी माझे वेळापूर मध्ये काम आहे शेजारचे अंकुश काळे यांना घेऊन जाऊन परत येत असताना सकाळी 10 53 च्या सुमारास विलास पवार यांनी फोनवरून तुझ्या आईचा व व अंकुश काळेचा यांचा हॉटेल गरुड जवळ समोर वेळापूर ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पंढरपूर कडे जाणाऱ्या रोडच्या पट्ट्यातून वेळापूरकडे जात असताना सकाळी 10:30 च्या सुमारास एका पांढऱ्या कारने धडक दिली आहे व त्यांचा अपघात झाला आहे असा फोन आल्याने लागलीच अपघात स्थळी येऊन अंबादास पवार यांनी पाहणी केले असता त्याची आई राणी तायप्पा पवार रोडच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेली होती तिच्यासमवेत असलेले अंकुश रामदास काळे यांना ॲम्बुलन्स मध्ये ठेवून सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो तेथे आई राणी पवार ची तपासणी केली तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले माझ्या ओळखीचे रामचंद्र भगवान बोडरे यांनी सांगितले की गरुड हॉटेल येथे मी थांबलो होतो त्यावेळी हॉटेलच्या समोरील रोडवर एक पांढऱ्या रंगाची कार अति भरधाव वेगाने हाय गयीने वेगाने येऊन तुझी आई चालवत असलेल्या स्कूटी पाठीमागून जोरदार धडक देऊन पळून गेली होती ती पुढे एक किलोमीटर अंतरावर जाऊन थांबली ती गाडी स्कोडा कंपनीची होती तिचा नंबर एम एच झिरो दोन डी झेड 43 65 असा होता त्यावरील चालकाचे नाव तेजस दत्तात्रय हुजरे राहणार आळी तालुका माणगाव गोरेगाव जिल्हा रायगड असे आहे तो तेथून पळून गेला आहे असे सांगितले अंकुश काळे यांची गाडी सुजुकी कंपनीची स्कुटी नंबर एम एच 45 ए डब्ल्यू 34 57 असा होता ती गाडी अंकुश रामदास काळे हे चालवत होते.
वेळापूर पोलीस स्टेशनला चालक तेजस दत्तात्रय हुजरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून याचा अधिक तपास विजय देशपांडे हे करीत आहेत


















