सोलापूर : मोहोळपासून सात किमी अंतरावर सय्यदवरवडे येथील तरुणाला अज्ञात कारणातून मारहाण करण्यात आली. ही मारहाण गुरुवारी दुपारी 4.30 च्या सुमारास झाली.
अमिर जब्बार शेख (वय 28, रा. सय्यदवरवडे ता मोहोळ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमिर हा गुरुवारी दुपारी 4.30 च्या सुमारास मोहोळ पासून सात किमी अंतरावर असताना, शहाजान मुजावर याने दारुच्या नशेत मारहाण केली.
यात पायाला जखम झाली तसेच सर्वांगास मुकामार लागल्याने मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून डॉक्टराच्या सल्ल्याने रात्री 11.10 वाजता उपचारास दाखल केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.