तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : भोकरदन येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वरंड्यात आम आदमी पार्टीच्या वतीने शाळेच्या बाबतीत विविध मागण्यासह झोपा काढा आंदोलन सुरू केले होते, आम आदमी पार्टीच्या वतीने गेल्या महिनाभरातभोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान सर्वे करण्यात आला होता.
भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळां काही ठिकाणी पडायला आल्या असून तर काही ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त आहे या अनुषंगाने गट शिक्षण कार्यालयाच्या वरंड्यात झोपा काढा आंदोलन सुरू केले होते, यावेळी गटशिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेंद्र साबळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली आणि आमच्या अधिकारातील कामे आम्ही पूर्ण करतो बाकी आमच्या अधिकारा बाहेरील जे आहेत त्या बाबी आम्ही वरिष्ठाकडे कळवले असून आंदोलन मागे घेण्याची विनंती करतो.
त्यानुसार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली आणि वरिष्ठाकडे केलेल्या मागण्या मंजुर करून घेण्यात याव्यात पाठ पुरावा करुन शाळांच्या समस्या सोडवा अन्यथा आम आदमी पार्टी मार्फत पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. आंदोलनामध्ये जनार्दन पा. सोळंके, महजाद खान,बोरसे गुरुजी ,इब्राहिम कुरेशी,फारुक भाई, धनराज भारती, बाबर भाई, फिरोज भाई, संतोष बोरसे, संतोष साळवे सलमान खान माणिकराव दळवी राज्यात चौधरी नांजा शिराज शहा ,जुनेकादरी, इब्राहिम कुरेशी रामदास बिरसोणेआव्हानाव पार्टिचे कार्यकर्ते सहभाग होता,