भोकरदन / जालना : दिनांक 22 डिसेंबर पासुन भोकरदन येथील पंचायत सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांचे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणास आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला असून बाबत तहसीलदार भोकरदन आणि गट विकास अधिकारी यांना पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले आहे,
दरम्यान सर्व जनतेने आणि शेतकरी बांधवांनी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घ्यावा असे आम आदमी पार्टीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या कामासाठी शेतकऱ्यांची आणि जनतेची आडवनुक पिळवणुक होते. कोणत्याच शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना शिस्त नाही. अधिकारी कर्मचारी आपले स्वतःचे सोय होण्यासाठी पुढार्यांना पैसे देऊन बदली करून आलेले आहेत. बरेच कर्मचारी खाजगी मध्ये सांगतात की आम्हाला पुढार्यांना हप्ते द्यावे लागतात. पुढार्यांनी सांगितलेली बेकायदेशीर कामे करावी लागतात. त्यामुळे खरे गरजवंत वंचित राहतात. कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. कधीही या कधीही जा कामे करा नका करू जनता मात्र परेशान आहे.
सुदैवाने भोकरदन तालुक्यात अनेक समाजसेवक जनतेसाठी आंदोलन,मोर्चे,उपोषण या ना त्या मार्गाने संघर्ष करताना दिसत आहे . या सर्व संघर्ष योद्धांचे जनतेच्या कामासाठी योगदान पाहता जनतेने यांना सहकार्य करणे व पाठिंबा देणे आवश्यक आहे.कारण ते स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी सतत लढत असतात. समाजसेवकांना आम आदनी पार्टी सतत पाठिंबा देत आलेली आहे. भोकरदन तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला व त्यांच्या सर्व मागण्यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा असून प्रशासनाने तात्काळ त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात पाठिंबा असल्याचे पत्र तहसीलदार भोकरदन आणि बीडिओ पंचायत समिती भोकरदन यांना आम आदमी पार्टीमार्फत देण्यात आलेले आहे. त्यांच्या जीवीताला धोका होऊ नये यासाठी तात्काळ मागण्या मंजूर करून प्रशासनाने त्यांचे उपोषण सोडवावे.यावेळी आम आदमी पार्टी मार्फत जालना जिल्हा सचिव बोरसे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष महेजाद खान कार्यकारणी सदस्य भगवान पालकर नारायण सोनी व पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

























