छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.) : अल्पसंख्याक आयुक्तालय हे अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींच्या शिक्षण, रोजगारासह सर्वांगिण विकासासाठी कार्य करेल, असा विश्वास अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.
सत्तार यांच्या हस्ते हज हाऊस येथे अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मंत्री सत्तार म्हणाले की देशातील पहिले अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजी नगर येथे होत असून या आयुक्तालय अंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणी, पाठपुरावा करून त्यांना वेळीच लाभ देणे शक्य होईल. करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगितले. अल्पसंख्यांक आयुक्तालयामुळे अर्जदाराच्या अर्जावर तात्काळ कारवाई होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद मदत होईल.
अल्पसंख्यांक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी हे एक विभाग कार्य करणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. शिष्यवृत्ती रोज शिष्यवृत्ती रोजगार उर्दू घर यासारख्या विविध सुविधा या आयुक्तालय मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व संबंधित विविध विभागाचे एकत्रित समन्वयन व शासन व अल्पसंख्यांक विभाग हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा एक दुवा ठरेल असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.