सातारा – संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत तुकडोजी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ,जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच संत नामदेव महाराज यांच्या मुखातून निघालेल्या अविट अशा भक्तिरस पूर्ण गोडिच्या अभंगांनी सज्जनगडच्या भक्तनिवास एक वेगळाच आनंद पसरला .औचित्य होते श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाचे .
भक्तनिवासात रंगलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ गायक राजेश्री वैरागकर -कुलकर्णी व अजिंक्य पोंक्षे यांनी समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या.. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ..यांनी केली. त्यानंतर ..चंदनासी परिमल.. सादर होत लाखो वारकऱ्यांचा लाडका विठुराया असलेल्या ..विठुराया माझा ..सादर झाले . वृंदावनी वेणू.. ही गवळण सादर करून रामाचे भजन अतिशय सुरेख चालीत गायकांनी सादर केली .सुप्रसिद्ध संगीतकार हेमंत पेंडसे यांनी चाल लेल्या ..आजी आनंद.. या गीताला रसिक डोलू लागले .बाजेरे मुरलीया.. सादर होत.. मुरलीधर शाम.. हे नाट्यसंगीत सादर झाले . त्यानंतर.. तेजोनिधी ..सादर होत संत रामदास स्वामींच्या ..राम गावा, राम घ्यावा..सादर होऊन आणखीन एक समर्थांचीच ..देव जवळी अंतरी.. ही रचना सादर झाली .त्यानंतर संत एकनाथ महाराज यांच्या.. प्रेमानंदे.. या अभंगाला सादर करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील रामनामाचे महत्त्व पटवून देणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ..रामतारक ..या रचनेवर गायन करून या दोन्ही गायकांनी संत तुकडोजी महाराज यांचे ..वाचे विठ्ठल गाईन ..सादर केले .सुप्रसिद्ध गायक पं.संजीव अभ्यंकर यांचे वतीने सध्या चर्चिले आणि गायले जात असलेले ..माई मेरे निर्धन को धनराम ..सादर होऊन ..आनंद सुद्धा.. हे नाट्यगीत सादर होऊन त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा ..बोलावा विठ्ठल ,पहावा विठ्ठल.. सादर करण्यात आला. संत नामदेव महाराजांचीच ..जननी ये जिवलगे.. ही रचना सादर होऊन रंगलेल्या या गायनसेवेची सांगता झाली.
या कार्यक्रमात राजश्री वैरागकर कुलकर्णी आणि अजिंक्य पोंक्षे यांनी अतिशय सुरेख असे अभंगवाणी संगीत गायन सेवेत सादर केली. त्यांना तबल्यावर साथ सुहास चितळे यांची पखवाजावर गणेश मेस्त्री यांची साथ होती तर ऑर्गन वादन सुशील गद्रे यांनी केले. व्हायोलिन वर उदय गोखले तर संवादिनी वर चैतन्य पटवर्धन साथीला होते .या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन पूर्वा पेठे यांनी केले. या सर्व कलाकारांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी केला.यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थभक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली .कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि.9 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सौ. कल्याणी देशपांडे यांचे सतार वादन तर बोरीवली येथील अद्वैत काशीकर यांचे बासरी वादन होणार असून यावेळी तबला साथ तनय रेगे ,मुंबई हे करणार असून या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत.
===========================फोटो ओळी.. सज्जनगड येथील दासनवमी उत्सवात अभंगवाणीसादर करताना रागेश्री वैरागकर -कुलकर्णी व अजिंक्य पोंक्षे.
फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.
























