सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषक प्रमाणे दाखवण्यात आल्याचा आरोप अभाविपने केला आहे. अभाविपने हे नाटक बंद पाडले आणि कारवाईची मागणी केली आहे.
देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली.
या नाटकाच्या विरोधात अभविपकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या घटनेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रण आणण्यात आली.
या घटनेबाबत अभाविप प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तर्फे रामलीला नाटक आयोजित केले होते. या नाटकामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा अपमान केल्याचे दिसले. याचा विरोध केल्यावर अभाविपच्या कार्यकर्त्यांवर काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा अभाविप तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि यामध्ये सहभागी असणार्याआ सर्व प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.