करकंब : येथे गेल्या ४५ वर्षांपासून सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या,कोणतीही लोकवर्गणी गोळा न करता,प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविणारे अभिनव तरुण मंडळ टिळक चौक करकंब यांचेवतीने जयपूर येथून आणलेल्या सुंदर अशा संगमरवरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी टिळक चौक येथील मंदिरामध्ये करण्यात येणार आहे.त्यानिमित्ताने दि.२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी या गणेशमूर्तीची बग्गीतून पारंपारिक वाद्ये,टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजरात गावामधून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी बालगोपाल, पुरुष, महिलाभगिनी, युवक, युवती, वृध्द करकंब व पंचक्रोशीतील गणेशभक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.याप्रसंगी महिलाभगिनी व पुरुषांनी फुगड्यांचा आनंद लुटला.
श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यासाठी विजय फडणीस,राजेश शहा,संजय शेटे,अरुण काळे,प्रवीण नागरस,पांडुरंग व्यवहारे,संतोष पिंपळे,आत्माराम चवरे,आनंद लिगाडे,आनंद देशमुख,अमित जोशी,काका देशमुख,शार्दुल शहा,महादेव तेली,मनोज शहा,सौरव देशमुख,संतोष शेटे,सुयोग नागरस,महिलाभगिनी,गणेशभक्त हे या सोहळ्यात उपस्थित राहून विशेष परिश्रम घेत आहेत.


























