ईस्लापुर / नांदेड – आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक ( शिक्षक )किनवट आदिवासी ऑफिसला कामासाठी जात असता सावरगावच्या पुढे किनवट महामार्गावर कार ला मागून धक्का दिल्याने कारचालकाचा संतुल बिघडल्याने कार तीन पलट्या खाल्ल्यामुळे चार शिक्षकांना जबर मार लागला स्थानिक च्या नागरिकांनी वेळेवर गाडीचा दरवाजा तोडून सगळ्यांना बाहेर काढून १०८ ने तुरंत ईस्लापूर येथील आरोग्य केंद्रात आणून त्यांच्यावर उपचार केला असून सदरील अपघाताची तक्रार अद्याप इस्लापूर ठाण्यात आली नसल्याची माहिती आहे .
आज दिनांक चार रोजी सुमारे १२ ते १२:३० वाजे दरम्यान किनवट जाणाऱ्या महामार्ग सावरगाव च्या समोर एका कंटेनर ने कार क्रमांक एम एस २६ बीसी ५४६३ या कार ला रनिंग मध्ये कंटेनर ने मागुन धक्का दिल्याने कार चालकाचा संतुलन बिघडल्याने रोडच्या डाव्या साईडला सदरील कार तीन पलट्या खाल्याची घटना घडली आहे सदरील अपघात झाल्याने कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला .
कार मधील १)उत्तम लालू वाघमारे अधीक्षक वय ५३ वर्ष रा . मुळझरा , २ ) गंगाधर शंकर वाघमारे वय ५० वर्ष रा .रावणपुरा ता .उदगीर ३ ) सुभाष नामदेव वाठोरे वय ५८ रा . महादापूर ता हिमायतनगर , ४ ) शेषेराव उत्तम पवार वय ३५ रा . डोंगरगाव यांना गाडी पलटी खाल्याने मार लागला सावरगाव येथील स्थानिक नागरिकांनी वेळेवर कार चा दरवाजा तोडून सदरील लोकांना बाहेर काढले व १०८ क्रमांकावर फोन करून सर्वांना इस्लापूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येऊन डॉ ऋषिकेश निकम , यांनी जखमीवर उपचार केले .























