कुर्डुवाडी – बायपास रोडवर भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पोल व झाडाला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी होऊन मयत झाले. ही घटना दि.१६ रोजी रा.२ वा. सुमारास कुर्डुवाडी – बार्शी रोडवरील बायपास रोड जुना टोलनाका कुर्डुवाडी ता.माढा येथे घडली.
आर्यन सुरेश जाधव वय १९ , चालक राजू वसंत पवार वय २४ रा. केंधळी तांडा, ता.मंठा जि.जालना अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सुरेश फुलचंद जाधव रा. केंधळी तांडा, ता.मंठा जि.जालना यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दुचाकी चालक राजू वसंत पवार व आर्यन सुरेश जाधव हे दुचाकी नं एम एच २१ बी वाय ७८६० वरुन दि.१६ रोजी रा. २ वा सुमारास कुर्डुवाडीकडून बार्शीकडे जाताना बार्शी कुर्डुवाडी जुना टोलनाक्याजवळ चालक राजू वसंत पवार यांने हयगयीने व निष्काळजीपणे, राॅंगसाइडने भरधाव वेगात जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक पोलला व तेथे असलेल्या लिंबाच्या झाडाला धडक दिल्याने यात फिर्यादीचा मुलगा व दुचाकी चालक दोघे गंभीर जखमी होऊन मयत झाले. याबाबत जाधव यांच्या फिर्यादीवरुन दुचाकी चालक मयत राजू वसंत पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कुर्डुवाडी (प्रतिनिधी)
@ छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ, कुर्डुवाडी च्यावतीने कुर्डुवाडी रेल्वेस्थानक येथे मंगळवार दि.१७ रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात ३५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन रक्तदान शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सी आर एम एस डिव्हिजनल सेक्रेटरी उल्हास बागेवाडी, संतोष कोलपकर ( टी आय कुर्डुवाडी) ,एस एस ई. सुरेश दानेकर,सुनील कुमार,विष्णू सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमारे ३५० रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला.यामध्ये महिला रक्तदात्यांचाही मोलाचा सहभाग होता.
यावेळी दिवंगत रेल्वे कर्मचारी बबलू कांबळे,प्रशांत बागल,जमीर शेख, प्रशांत लंगोटे,बालाजी पालकर,सचिन उकरंडे,नागेश शिंदे, सुनील मोरे,श्रीकांत वाघमारे,अस्लम शेख यांना यावेळी श्रद्धांजली वाहाण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर रणदिवे,प्रशांत शिंगाडे,विठ्ठल चांगभले,आनंद महामुनी, धनंजय खटके,रियाज शेख,अक्षय गोरे,कृष्णा गोडसे,अमोल बागल,परवेज शेख,राहुल देशमुख,आकाश उकरंडे,अमोल होले,अमोल सुरवसे,कुलदीप अस्वरे,सादीक काझी,संतोष लोकरे,समाधान पवार,योगेश नकाते,संतोष काटकर, अभिषेक काळे, आकाश उकिरडे, वैभव जाधव, बापू पारखे, मदन शिंदे, अजित नलवडे, समीर शेख, उमेश हणवते, रोहित राऊत आदींनी परिश्रम घेतले.























