माढा – तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी, कुर्डु, मोडनिंब, आलेगाव, आहेरगाव सह सर्व गावात रितसर मागणी केलेल्या सर्व केशरी कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा करावा अश्या मागणीचे लेखी निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने माढा चे तहसीलदार संजय भोसले यांना देण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा सर), विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. धनश्रीताई उत्पात यांचे सूचनेनुसार व सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या आदेशानुसार आणि सर्व विश्वस्त, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी माढा तहसील कार्यालयात तहसीलदार संजय भोसले यांना मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी स्वराज्य चे तालुका कार्याध्यक्ष आनंद क्षीरसागर, तालुका संपर्क प्रमुख अशरफ शेख, माढा शहर अध्यक्ष अप्पासाहेब गवळी, कुर्डुवाडी चे अध्यक्ष सागर भोईटे, शहर समन्वयक अविनाश ननावरे, खोपोली शहर पोलीस मित्र उपाध्यक्ष कैलास मोरे, प्रादुग्न राजुरे सह समवेत स्वराज्य अनेक चे सदस्य उपस्थित होते.

























