सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूर येथील स. लेखाधिकारी हरेश म्हेत्रस यांची महाराष्ट्र शासनाने लेखा अधिकारी -१ या पदावर पदोन्नतीने जिल्हा परिषद सोलापूर येथे पदस्थापना दिली आहे.
श्री हरीश म्हेत्रस यांनी यापूर्वी आरोग्य विभाग, कृषी विभाग, अर्थ विभाग, ऑडिट विभाग व वेतन पडताळणी या शाखेत आपला कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे.
तसेच त्यांना यावर्षीचा महाराष्ट्र न्यूज चॅनलने आयकॉन ऑफ महाराष्ट्र सन 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे .त्यांच्या या यशाबद्दल मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
















