बार्शी – डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्यावतीने डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन-गौरव’ पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यात लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी शहाजी फुरडे-पाटील यांचाही गौरव करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त रणजीत धुरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, क्रेडाई बार्शीचे अध्यक्ष सतीश अंधारे, प्रा. कॉम्रेड तानाजी ठोंबरे, डॉ. अजित पोकळे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश राऊत आदी उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी- शैक्षणिक क्षेत्र– संभाजी घाडगे,उद्योजक क्षेत्र– गौतम कंकरिया, सामाजिक क्षेत्र– राहुल भड, वैद्यकीय क्षेत्र– डॉ. संदीप तांबारे, कृषी क्षेत्र– नितीन (बापू) कापसे, पत्रकारिता क्षेत्र– शहाजी फुरडे-पाटील, साहित्य क्षेत्र– विमल माळी, कला क्षेत्र– अभय चव्हाण, क्रीडा क्षेत्र– राहुल तिवाडी.
उद्घाटक प्रा. डॉ. राजेंद्र दास म्हणाले, “मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी माणसे एकमेकांजवळ येत नाहीत. माणसे लहान नाहीत, पण मने लहान झाली आहेत. आपल्या कामातून आपले अस्तित्व निर्माण झाले पाहिजे. आज नवरत्नांचा झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे.”
अध्यक्ष रणजीत धुरे यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी समाजात मिसळणे आवश्यक असल्याचे सांगत, १९९५ ते १९९८ या कालावधीतील आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.
प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष प्रा. सुरेश राऊत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पुरस्कार विजेत्यांची ओळख करुन दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुरेश राऊत (अध्यक्ष), शशीकांत गोडगे (उपाध्यक्ष), सतीश राऊत (सचिव), संतोष गुजरे (सहसचिव), भरत खांडेकर (खजिनदार) तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले.


























