सोलापूर : महापालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने बेवारस वाहन हटाव मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी विभागीय कार्यालय क्र. ८ हद्दीत पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू आहे. शानदार चौक येथे उभे असलेले आयशर ट्रक जप्त करण्यात आले, तर गुरुनानक चौक पोस्ट ऑफिस, कुर्बान हुसेन नगर परिसरातील दोन रिक्षा उचलून दंडात्मक कारवाई करण्यात आली. भद्रावती पेठ आणि मोदी कब्रस्तान येथील चारचाकी वाहने त्यांच्या मालकांनी स्वतः काढून घेतली.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक वाहन अनिल चारटे,आरोग्य निरीक्षण निरीक्षक व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त टीममार्फत पार पडली. सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ उभी ठेवलेली वाहने त्वरित हलवावीत, अन्यथा १० हजार दंड, टोविंग खर्च आणि लिलावाची कारवाई होईल, असा इशारा मनपाने दिला आहे.



















