सोलापूर – पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांच्याकडून महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने धडाकेबाज प्रतिबंधक कारवाईस करण्यात आली असून ०२ दिवसांमध्ये रेकॉर्डवरील ०३ सराईत गुन्हेगारांना M.P.D.A. अंतर्गत केले स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्विकारल्यापासून 50 सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, शहरातील आम जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होवुन त्यांच्या विरुध्द पोलीसांकडे तक्रार अथवा माहीती देण्यास कोणी तयार होत नव्हते. या अनुषंगाने तसेच महानगर पालिका निवडणुक प्रक्रिया निर्भड वातावरणात सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राज कुमार यांनी मागील दोन दिवसांत 03 सराईत गुन्हेगारांवर M.P.D.A. अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.

यामध्ये मिथुन धनसिंग राठोड वय 33 वर्षे रा. घोडतांडा, द. सोलापूर जि. सोलापूर हा एक सराईत हातभट्टीवाला असून, स्थानबध्द इसम हा जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत व आजुबाजुच्या परिसरात बऱ्याच वर्षापासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची विक्री करण्यासाठी अनेक हातभट्टी-दारुचे गुत्ते अड्डे चालवत आहे. अशा प्रकारे स्थानबध्द इसम हा महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतुदीचा भंग करुन पोलीसांची नजर चुकवुन गावठी हातभट्टी दारुची वाहतूक, पुरवठा आणि विक्री करणे या सारखे गुन्हे करण्यात गुंतलेला आहे. स्थानबध्द इसम हा त्याच्या साथीदारासह वाहनाव्दारे हातभट्टी दारुची वाहतुक करताना वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवतो. त्यामुळे रस्त्याने येणारे व जाणारे, परिसरातील आणि इतर लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. वरनमुद परिसरातील गावठी हातभट्टी दारुच्या अड्डयावर हातभट्टी दारु पिलेल्या लोकांमुळे तसेच हातभट्टी दारुची वाहतुक आणि विक्रीमुळे दुर्गंधी पसरुन परिसरात अस्वच्छतेचे आणि अनारोग्याचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानबध्द इसमाच्या या कारवाईमुळे परिसरातील लोकांच्या मनामध्ये भिती व दहशत निर्माण झाली आहे. तसेच त्याच्या या गुन्हेगारी कारवाया नमुद परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास बाधक व परिसरातील लोकांचे आरोग्यास हानीकारक ठरत आहेत. त्याच्या विरुध्द अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण 27 गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. तसेच त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी क. 93 महाराष्ट्र दारुबंदी अधि.अन्वये, सन 2024 व 2025 मध्ये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही, त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली असल्याने त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दि. 18/12/2025 रोजी स्थानबध्द करण्यात आले आहे.
सलमान गुडु पटेल, वय 27 वर्षे, रा. प्लॉट नं. 72, विष्णु नगर भाग-2, मजरेवाडी, सोलापूर हा त्याच्या साथीदारासह जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात चाकु, सुरा, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, कोयता आणि काठी यासारख्या जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, गृहअतिक्रमण करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गुन्हे करीत आहे. स्थानबध्द इसमाच्या या कारवायामुळे सामान्य लोकांमध्ये मिती आणि असुरक्षीतता निर्माण झाली आहे. स्थानबध्द इसम हा स्वतःच्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण 09 गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. तसेच त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी क. 110 फी.प्र.सं. 1973 अन्वये, सन 2024 मध्ये क. 56 (1) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही, त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली असल्याने त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दि.19 डिसेंबर 2025 रोजी स्थानबध्द करण्यात आले आहे.

अश्रफअली उर्फ टिपू मन्नान ऊर्फ मुनाफ बागवान, वय 33 वर्षे, रा. 793 शुक्रवार पेठ, सोलापूर हा त्याच्या साथीदारासह फौजदार चावडी पोलीस ठाणे परिसरात चाकु, सुरा, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, कोयता आणि काठी यासारख्या जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, गृहअतिक्रमण करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गुन्हे करीत आहे. स्थानबध्द इसमाच्या या कारवायामुळे सामान्य लोकांमध्ये भिती आणि असुरक्षीतता निर्माण झाली आहे. स्थानबध्द इसम हा स्वतःच्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण 07 गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. तसेच त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी क. 110 फौ.प्र.सं. 1973 अन्वये, सन 2023 मध्ये क. 56 (1) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 व सन 2016 व 2018 मध्ये कलम 3 एमपीडीए अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही, त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली असल्याने त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दि.19/12/2025 रोजी स्थानबध्द करण्यात आले आहे.
ही कारवाई एम. राज कुमार, पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-01, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, शिवाजी राऊत, वपोनि, जेलरोड पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, प्रमोद वाघमारे, वपोनि, एमआयडीसी पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, महादेव राऊत, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सपोनि तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ विनायक संगमवार, पोहेकॉ सुदीप शिंदे, पोशि अक्षय जाधव, पोशि विशाल नवले यांनी केली आहे.


























