सोलापूर – नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. तरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खचून न जाता काँग्रेसची विचारधारा घेऊन खेडो-पाडी,वाडी, वस्ती पिंजून काढून गाव तेथे काँग्रेस पक्षाची शाखा स्थापना करून पुन्हा जिल्ह्यात काँग्रेस उभा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसची चिंतन बैठक काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष शटगार पुढे म्हणाले कि, कार्यकर्ते एवढ्या पराभावानी खचून जाणार नाहीत. काँग्रेस पक्षाला १४० वर्षाची परंपरा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेला काँग्रेस पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान दिलेला पक्ष आहे.
इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे बलिदान व सोनिया गांधी यांनी केलेला त्याग खा. राहुल गांधी यांनी सत्यासाठी लढत असलेला लढा हे कधीही आम्ही वाया जाणार नाही. यासाठी रक्ताचे पाणी करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , खासदार प्रणिती शिंदे यांचे हात बळकट करून जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस उभा करू असे मत सातलिंग शटगार यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रदेश सचिव सुरेश हावळे, तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, उपाध्यक्ष सिकंदरताज पाटील,अॅड. संजय गायकवाड, मोतीराम चव्हाण, सिद्राम पवार, अॅड.चिदानंद सुंटे, रावसाहेब व्हनमाने, संजय राठोड, प्रशांत कांबळे,किरण सुर्वे, अमीर शेख,असलम शेख,दत्ता पवार, युवराज कापसे,सलीम शेख, राजकुमार राठोड,लखन चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.


























