सोलापूर – महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या कलाकारांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या स्पर्धेत कलाकारांनी ” विठ्ठलास आमंत्रण ” हे नाटक चार पारितोषिके संपादन करत यश प्राप्त केले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या नॅब संस्थेच्या राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेने सातत्याने यश प्राप्त केले आहे त्याचेच परंपरा राखत यंदाच्या वर्षीही फुलावती आगाशे विठ्ठलास आमंत्रण हे नाटक सादर केले साधारणपणे 25 कलावंत सहभागी असणारे हे नाटक रसिकांच्या पसंती उतरले.
या स्पर्धेत फुलावती आगाशे यांना उत्कृष्ट लेखनाचे तृतीया पारितोषिक रेवती लिंगाणे हिला उत्कृष्ट अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र आणि अंकिता वाघमारे हिला ही अभिनयाचे उत्कृष्ट गुणवत्ता प्रमाणपत्र तर समर्थ आगाशे याला नेपथ्याचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांना दिग्दर्शक अश्विनी तडवळकर, नाटय प्रशिक्षक अमीर तडवळकर, शिक्षक अन्नपूर्णा साखरे मुख्याध्यापक सौरभ शिंगाडे, भैरप्पा कारभारी, रमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या विजेत्या कलावंतांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार, संस्थेचे सचिव शशीभूषण यलगुलवार, बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी अभिनंदन केले आहे.






















