वळसंग – द.सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशन कडून दरवर्षी गणल्या जाणारे आदर्श कला शिक्षक उपक्रमशील सहकारी शिक्षक व क्रीडाप्रेमी शिक्षकेतर कर्मचारी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बोरामणी येथील एस व्ही सी एस प्रशाला येथे नुकताच संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली व दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सौ जयश्री सुतार, संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे, द.सो क्रीडा शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष वीरेश थळंगे, द. सो. माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शशिकांत उपासे, व एस.व्ही.सी.एस प्रशाला बोरामणीचे प्राचार्य महांतेश अतनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला आहेरवाडीचे माजी मुख्याध्यापक गुरुपादप्पा तूप्पद, गेनसिद्ध प्रशाला कुंभारीचे माजी मुख्याध्यापक हणमंत चौगुले, स्वामी विवेकानंद प्रशाला शिंगडगावचे माजी मुख्याध्यापक भारत साठे, एस.व्ही.सी.एस प्रशाला भवानी पेठचे माजी मुख्याध्यापक राजकुमार भोरे, बाळे येथील माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन चनबसप्पा बिराजदार, लोकसेवा विद्यामंदिर मंद्रूप चे क्रीडाशिक्षक श्रीधर टेळे, बोरामणीचे केंद्रप्रमुख गुरुलिंग व्हनमाने पर्यवेक्षक शिवानंद बिराजदार आहेरवाडी प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ संध्या कुनाळे इत्यादींनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मल्लप्पा कोनापुरे प्रशालेचे क्रीडाशिक्षक विश्वनाथ गावडे एस.व्हि सी.एस प्रशाला बोरामणीचे क्रीडा शिक्षक रवींद्र डोंबाळे यांनाआदर्श क्रीडा शिक्षक म्हणून, इंडियन पब्लिक स्कूलचे महासिद्ध वाले आणि शावरसिद्ध प्रशाला आचेगावचे शावरसिद्ध म्हेत्रे यांना उपक्रमशील सहकारी शिक्षक म्हणून तर गणेश रामचंद्र चितळे प्रशाला बरूरचे कर्मचारी सुरेश कोळी जीवन ज्योत प्रशाला कंदलगावचे कर्मचारी शिवलिंग कोले यांना क्रीडाप्रेमी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी बोरामणी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापिका माधुरी पाटू यांना व पर्यवेक्षक शिवप्पा बिराजदार यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचेही शाल व बुके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दक्षिण सोलापूरचे माजी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे सध्याचे दक्षिण सोलापूर गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतय्या स्वामी यांनी क्रीडा शिक्षक कसा असावा आणि त्यांचे आरोग्य याविषयी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशनचे पदाधिकारी उपाध्यक्ष विकास दसाडे, सुखदेव गुरव, सचिव शिरीष गुरव संतोष पाटील, संतोष भोसले, संतोष कस्तुरे, गुरु अचलेरे, बाबुराव पुजारी, सुनील टेळे, सिद्धाराम अंकुशे, शावरसिद्ध पाटील, भीमाशंकर सगरे, शोभाराणी कुंभार इत्यादी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे प्रवीण कुंभार व संतोष पाटील यांनी मांडले.






















