सोलापूर – सोलापूरचे सुपुत्र मल्लिनाथ जेऊरे अतिरिक्त आयुक्त जी.एस.टी.मुंबई यांनी श्री मशरूम गणपतीचे आरती व पूजा करून दर्शन घेतले या वेळी त्यांनी मंदिराची पाहणी व माहिती घेतली मंदिरातील सोयी सुविधा शिस्त स्वच्छता तसेच भक्तांची सेवा मंदिर समितीच्या वतीने घेतली जाते यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा श्री मशरूम गणपतीची प्रतिमा शाल श्रीफळ प्रसाद देऊन मंदिराचे पुजारी श्री संजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, आप्पाशा जेऊरे ,भैय्या पतंगे, दीपक देशमुख, ईश्वर पतंगे, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी व पदाधिकारी उपस्थित होते.






















