सोलापूर – मित्र म्हणजे आपल्या सुख दुःखातील साथी. मित्र म्हटलं की भान हरपून एकमेकात घोळून जातो. मित्राशिवाय आयुष्य अर्धवटच आहे. दुःख विसरून जाण्याचे व हलके करण्याचे ठिकाण म्हणजे मित्र. अडीअडचणीत कामाला येणारा मित्रच असतो. पोट तिडकीने आपले चांगले व्हावे हे सांगणारा, योग्य मार्ग दाखवणारा मित्रच असतो. असेच सर्व जीवलग मित्र व मैत्रिणी जे लहानाचे मोठे सुलाखे हायस्कूल, बार्शी मध्ये पहिली ते दहावी एकत्र राहिले ते आज 60 ते 65 मित्र मैत्रिणीं इतक्या संख्येने एकत्र जमले 37 वर्षानंतर , निमित्त होते हुरडा पार्टी चे.
रविवारी बार्शीत डॉ दीपक जाधवर याच्या शेतात सर्व वर्गमित्रांनं हुरडा पार्टी निमित्ताने खूप आनंद लुटला. आदल्या दिवशी शनिवारी सकाळी पासून सोलापूर, बंगलोर , पुणे, सांगली, मुंबई आदी ठिकाणी हून मित्र मैत्रिणी हळू हळू जमले. रविवारी सकाळी 9 पासून शेताकडील वाट धरली. शेतामध्ये केळीच्या बागेत सर्वांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या बागेत बसून सर्वांनी वेलकम ड्रिंक आणि फळ आहार च आनंद घेतला. चिक्कू, संत्रे, अंजिर, खरबूज, व मिठाई त्या सोबतच ढाळे सुद्धा होते. खाता खाता मस्तच गप्पा, चेष्टा मस्करी सुरू झाल्या. गप्पा गोष्टी ची महफिल रंगली. दिवसभरातील प्रत्येक क्षणचित्र टिपण्यासाठी एक फोटोग्राफ बोलवण्यात आला होता. पाणी पिण्यासाठी पाणी असताना अनेकांनी मठ्ठा पिऊन तहान भागवली. गप्पा ने पोट भरतच नाही तोवर शेतातील कर्मचारी यांनी हुरडा भाजून, मळून, चाळून गरमा गरम हुरडा खायला दिला. हुरड्यासोबत शेंगा चटणी, गुळ, मसाला चटणी आदी पण होते. हुरडा खाऊन सर्व थकले. त्यानंतर शेत शिवार फेरी सुरू झाली. फिरून शेतातील दुसऱ्या भागात मंडप उभारण्यात आला होता इथे सर्वजण जमले.
या मंडपात बसून प्रत्येकांनी आपला परिचय करून दिला. कारण इतक्या वर्षानंतर भेटल्याने चेहरेही बदलले आणि कोण काय करतोय हे ही माहिती नाही. अनेक जन आज इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, सरकारी उच्च अधिकारी आदी विविध क्षेत्रात मोठे झाले. आज अनेक जन व्यवसाय, नोकरी निमित्ताने विविध शहरात विखुरले गेले.
त्यानंतर गाण्याच्या भेंड्या खेळण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी सोलापूरी कडक भाकरी, चटणी, झुणका आदी भोजनाचा आस्वाद घेतला. डॉ दीपक जाधवर याचा सोलापूरी फर टोपी, हार घालून सर्वांतर्फे सत्कार करण्यात आला. डॉ जाधवर यांनी सर्व मित्र मैत्रिणींना बार्शीची आठवण म्हणून बार्शीचे दैवत श्री. भगवंत यांची मूर्ती भेट दिली. अशा रीतीने हुरडा पार्टी ची सांगता झाली.
या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ दीपक जाधवर, अनिल जोशी, मंदार कुलकर्णी, रुपेश शिंदे, जयराम गोले, सागर जोशी, दीपक सोमाणी, उमेश चव्हाण, किरण देशमुख, अंकुश कोत्तावर , लक्ष्मण गरड आदींनी महिनाभर मेहनत घेतली.























