मुखेड / नांदेड – येथून 1974 साली 10 वी पास झालेल्या वर्ग मित्रांचा सपत्नीक स्नेह मिलन मेळावा नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला असून ५१ वर्षांनंतर स्नेह मिलन मेळाव्यातुन सहपत्नीक भेटताना लहानपणीच्या आठवणी निघताच झाले अश्रू आणावंर !
नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरीचे भुमिपूत्र 1974 साली 10 वी पास झालेल्या त्या बॅचला 51 वर्षे पूर्ण झालयाबद्दल सर्व वर्ग मित्रांनी नांदेड येथील विमानतळ रोडवरील हाॅटेल सिटी सिम्फणी येथे स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सपत्नीक स्नेह मिलन मेळावा साजरा केला असून या कार्यक्रमाची सुरुवात सौ.पंकजा देशमुख, सौ. पुष्पा बियाणी, सौ.कलंत्री, सौ.वसुधा कोडगिरे, सौ.हिरेमठ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून,दीप प्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकात माजी कृषि संचालक सुरेश आंबुलगेकर म्हणाले की, 1974 साली आपण सर्व वर्ग मित्र एका माळेतील मोती होतो. नंतर ही माळ तुटली. तब्बल 51 वर्षानंतर पुन्हा ही माळ अथक परिश्रमाने जुंपली. महिलांचा सहभाग वाढवावा म्हणून सपत्नीक मेळावा घेतला.यापुढेही दरवर्षी 25 डिसेंबरला असाच मेळावा घेवू असे सांगितले.
यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त केले. सौ.वसुधा कोडगिरे म्हणाल्या की, संसार सुखी होण्यासाठी सद्गुरू ची आवश्यकता असते. सद्गुरु सन्मार्ग व ऊर्जा देतात. त्यातून जीवनाला उभारी येते.
सौ.शिला पाळेकर म्हणाल्या की, महिलांनी नेहमी हसमुख असावे त्यामुळे ताण तणाव व दुःख कमी होते. स्वतः शी प्रामाणिक राहा जसकारात्मक दृष्टिकोन व उच्च ध्येय ठेवावे. यावेळी शहेनाज परविन, बालाजी ढगे, माजिदखान, यानीही मनोगत व्यक्त केले. स्नेह मिलन मेळावा यशस्वी करण्यासाठी मधुसूदन कलंत्री, सुरेश आंबुलगेकर, जगदिश बियाणी,शिवराज मुगावे, अंबादास देशमुख, प्रभाकर रेणगुंटवार, महंमद चौधरी, मोलाना सय्यद, मोरे, मल्लीकार्जून एकाळे, आदीनी परिश्रम घेतले.
मेळाव्याची आठवण म्हणून एम.जे.एम. काॅलेज मध्ये ग्रुप फोटो घेण्यात आला. महिलांचा संगित खुर्ची हा खेळ झाला. मेळाव्याची आठवण म्हणून यावेळी भेट वस्तू देण्यात आली.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांना वाढदिवसानिमित्त सौ.कालिंदी सुरेश काचावार यांचा पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.
मेळाव्याचे सुत्र संचालन अंबादास देशमुख यांनी केले. ५१ वर्षांनंतर स्नेह मिलन मेळाव्यातुन सहपत्नीक भेटताना लहानपणीच्या आठवणीने प्रत्येकांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.


























