कुर्डूवाडी – जि.प. ,पं.स.निवडणूकीच्या आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातील छत्तीस गावच्या कुर्डू व भोसरे मतदार संघात राष्टृवादी काँग्रेस पक्षाच्या एबी फाँर्मवरून अतीशय नाट्यमय घडामोडी घडल्या असून दोन दीवसापासुन एबी फार्म मोहीते -पाटील गटाकडे की शिंदे गटाकडे यावरून असलेला सस्पेन्स दुपारी अडीच वाजता माजी आ.संजयमामा शिंदे यांच्या उमेद्वारांना मिळाल्यानंतर संपुष्ठात आला.एबी फाँर्मवरून शिंदे गटाची कोंडी करू पाहणा-या मोहीते -पाटील गटाला पक्षाकडूनच संजयमामांनी चाणक्य नितीने बी प्लँन तयार ठेवल्याने झटका बसला. अचाणकच वरीष्ठ पातळीवरून एबी फाँर्म शिंदे गटात शहराध्यक्षाकरवी मीळाले.
माढा तालुक्यातील सात जि.प. गट व चौदा पं.स.गणासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दीवस होता.माढा येथील शासकीय गोडावून मध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती.भाजप आणी राष्टृवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाजतगाजत उमेद्वारी अर्ज दाखल केले.माढा तालुक्यातील टेंभूर्णी, उपळाई,मोडनिंब,मानेगाव,पिंपळणेर, बेंबळे हे जि.प.गटातील व गणातील उमेद्वारांनी अर्ज दाखल केले.भाजपाच्या वतीने जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्याकडे सर्व एबी फाँर्म आले होते.तर राष्टृवादी काँग्रेसचे खा.धैर्यशिल मोगीते पाटील यांच्याकडे सर्व सुत्रे असल्याने शिवतेजसिंह मोहीते पाटील हे फार्म घेवून आले होते.त्यांच्यासमवेत आ.अभिजीत पाटील होते.
ख-या नाट्यमय घडामोडी तर माढा तालुक्यातील भोसरे व कुर्डू जि.प. व त्यातील कुर्डू, अकोले,भोसरे,रोपळे गणातील एबी फार्मवरूनच घडल्या. काल रात्रीपर्यंत मोहीते पाटील गटाचे करमाळ्याचे राष्टृवादी काँग्रेस (शप) चे आ.नारायण पाटील यांनी भोसरे व कुर्डू गटातील उमेद्वारीही जाहीर केल्या होत्या. सुरवातीपासुनच दोन्ही राष्टृवादी काँग्रेसची युती झाल्याने सर्व अधिकार खा.धैर्यशील मोहीते पाटील यांच्याकडे होते. त्यामुळे सर्लच ठीकाणी घड्याळावरच निवडणूका लढवून माजी आ..संजयमामा शिंदे यांची कोंडी करण्याचा षडयंत्र सुरू झाले.आज सकाळी अकरा पर्यंत शिंदे गटाकडे फाँर्म नव्हते .तातडीने संजयमामांनी बी प्लँन केला.सर्वच उमेद्वारांना एक अपक्ष व एक पक्षाचा फाँर्म भरण्याच्या सुचना दील्या. मोहीते पाटील गटाकडूनही घड्याळाचे एबी.फाँर्म येत आहेत याची वाट पहात उमेद्वार थांबले होते.तसे त्यांची कार्यकर्तेही बोलत होते. कदाचीत संजयमामाचा बी प्लँन चा डाव चांगलाच यशश्वी झाला.अचानक अडीच वाजता शिंदे गटाकडे राष्टृवादी काँग्रेस चे एबी फाँर्म आले असता मोहीते पाटील गटाचा डावच उधळला असल्याची चर्चा सुरू झाली.शेवटी उध्दव सेना,शिंदे सेना राष्टृवादी काँ.शप गटाची युती झाल्याने आ.नारायण पाटील यांच्या उमेद्वारांनी तुतारी घेणेच पसंत केले.त्याप्रमाणे तर भोसरे जि.प.मध्ये तुतारीवर ,रोपळे गणात बाण, तर भोसरे गणात मशालीवर निवडणूका लढवण्याचे फायनल झाले. युतीधर्माला ईथेच बगल मीळाली अजित पवार यांची राष्टृवादी संजयमामांच्या नेतृत्वात निवडणूका लढवणार हे निच्छीत झाले. अखेर इथेच दोन्ही राष्टृवादी काँग्रेसमध्ये बीघाडी झाली.
शिंदे घरातील उमेद्वार नाहीच.—
1995 च्या पुर्वी पासुन कुर्डू जि.प.गट हा माजी आ.शिंदे बंधूंचा बालेकील्ला आहे.याठीकाणी जनरल आरक्षण पडल्यास अकोले पं.स.गणात किंवा गटात शिंदे घराण्यातील एक उमेद्वार असतोच.काही वेळेस तर इतरही काही मतदारसंघातून शिंदे घराण्यातील उमेद्वार उभा राहीलेला आहे. मात्र यावेळची निवडणूक ही पुढील राजकीय दृष्या महत्वाची असल्याने कुर्डू मतदारसंघ व अकोले गण जनरल असूनही एकही उमेद्वार घरातील द्यायचा नाही असा पवीत्रा संजयमामा शिंदे यांनी घेतला होता.या गटात आण्णा ढाणे व विक्रम शिंदे हे जि.प.साठी इच्छूक होते.धनराज शिंदे हे सुरवातीपासुच सर्व प्रक्रीयेपासुन अलीप्त असल्याने त्यांनी इच्छा व्यक्तच केली नाही.शेवटी आण्णा ढाणे यांना उमेद्वारी मीळाली.
माढा भाजपात फुट.
माढा तालुक्यातील जि.प.चे पाच व दहा गणाचे भाजपा पक्षाचे तिकीट वाटपाचे सर्व अधिकार रणजितसिंह शिंदे याना होते.त्यांनी बेरजेचे राजकारण करत वरीष्ठांच्या सल्ल्याने भिमानगरची जि.प.ची उमेद्वारी संजय पाटील भिमानगरकर यांना तर मानेगाव जि.प.ची उमेद्वारी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सांवंत यांना अंतीम क्षणी जाहीर केल्याने चांदजचे माजी जि.प.सदस्य शिवाजी पाटील व जामगावचे मार्केट कमिटीचे व्हा.चेअरमन सुहास पाटील यांनी बंडखोरी करत खा.धैर्यशिल मोहीते पाटील यांची भेट घेत राष्टृवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मानेगावची जामगावकर यांना तर टेंभूर्णीची शिवाजी पाटील यांना उमेद्वारी मीळाली.
















