मंगळवेढा – काका, पास घरी राहिला आहे… माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील…’ अशी कळकळीची विनंती करत असलेल्या पाचवी वर्गात शिकणार्या ऐका चिमुकल्याला एसटीचा पास विसरल्याने चक्क त्याला निर्मणूष्य ठिकाणी उतरवण्याचा महाप्रताप मंगळवेढा आगाराच्या कंडक्टरने केल्याचा प्रकार आसुन या घटनेची चाैकशी करून संबधीत कंडक्टवर निलंबना सारखी कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा पाचवीतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे ताे ब्रह्मपुरीहूण मंगळवेढा आगाराची सोलापूर–मंगळवेढा (बस क्रमांक ९४०५) या एसटीने प्रवास करत होता. ब्रह्मपुरीपासून ७ की.मी. अंतरावर बस आल्यानंतर वाहक तिकीट काढण्यासाठी आले यावेळी प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला असता, तो चुकून घरी राहिल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या आवाजात त्याने वडिलांना फोन करण्याची विनंती केली. ‘पप्पा पैसे देतील,’ असे तो वारंवार सांगत होता. मात्र त्या निरागस शब्दांनाही वाहकाने किंमत दिली नाही. क्षणाचाही विचार न करता बसचा दरवाजा उघडून त्या चिमुकल्याला थेट माणववस्ती नसलेल्या काळ्या शिवारात माणूसकी विसरून त्या वाहाकाने थेट खाली उतरवले.पास जवळ नसला करी आँडव्हाँनस् पैसे मुलाने भरलेच हाेते आशा प्रतिक्रीया या घटनेनंतर पालकांनी व्यक्त केल्या. आशा बेजबादार कर्मचार्यामूऴे शासनाची एस.टी.मात्र बदनाम हाेत आहे. अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यांत पाणी व मनात भीती आणि आजूबाजूला निर्मणूष्य वस्ती अखेर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात दाखवला. त्या व्यक्तीच्या मदतीने तो कसेबसे घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याच्या थरथरत्या आवाजात घडलेला प्रकार ऐकून पालक कुटुंबीय हादरून गेले. या घटनेनंतर पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. “पास विसरणे ही चूक असू शकते; पण त्यासाठी लहानग्या विद्यार्थ्याला आडराणात उतरवणे म्हणजे त्याच्या जीवाशी खेळ आहे,” असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त,जिल्हा आगार प्रमुख व तालुका आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे.
.अशा घटनांमुळे संपूर्ण एसटी महामंडळाच्या विश्वासार्हतेचे नुकसान होत आहे. आता केवळ चौकशी नव्हे, तर धडा शिकवणारी कठोर कारवाईच आवश्यक असल्याची तीव्र भावणा नागरिकांतून व्यक्त हाेत होत आहेत.
या घटनेची संपुर्ण चाैकशी करून साेलापुरच्या वरिष्ठ आधिकार्यांना अहवाल पाठवला आहे.
संजय भाेसले,आगार प्रमुख,मंगळवेढा.
























