पंढरपूर – दिल्ली येथील बॉम्बस्फोटाच्या घटने नंतर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्र्यांकडून विविध यंत्रणांना सतर्कते विषयी सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील गृहविभागाच्या सुचने नंतर पंढरपूरातील पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली असून येथील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली आहे.
दिल्ली येथे लालकिल्याच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारी (ता.१०) सायंकाळी बाँम्बस्फोट झाला. या स्फोटात ९ नागरिकांचा मृत्यु झाला तर २० ते २५ नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत.या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सुरक्षा देखील वाढविली असल्याचे दिसून येत आहे
विठ्ठल रुक्मिणी मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने मध्यंतरीच्या काळात दिला आहे. यामुळे गेल्या वीस वर्षापासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास २४ तास सुरक्षा ठेवण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी दिल्ली येथे कार मध्ये भिषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरची सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे.
मंदिरात डॉगस्काँड द्वारे तपासणी करण्यात येत असून मंदिरात येणाऱ्या, जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तसेच त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून मंदिराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.




















