मंद्रूप – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील श्री मळसिध्द यात्रेत शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन आणि लक्ष दीपोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हे दोन्ही उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार नियोजन बैठकीत करण्यात आला.
मळसिध्द यात्रेच्या नियोजन संदर्भात यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीस माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे व अप्पाराव कोरे, हर्षवर्धन देशमुख, मळसिध्द मुगळे, जगन्नाथ म्हेत्रे, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, मळसिध्द पुजारी, गौरीशंकर मेंडगुदले, कांतू ख्याडे, चंद्रकांत देशमुख, विश्वनाथ हिरेमठ, मुत्या वाडकर, तमण्णा पुजारी, सुरेश टेळे, नितीन टेळे, शब्बीर मुल्ला, शिवराज कालदे, अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी यावर्षीपासून यात्रा कालावधीत शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावेत तसेच मंदिर परिसर आणि नंदीध्वज मिरवणूक मार्गावर लक्ष दीपोत्सव सुरू करावेत. मंदिर परिसरात धूळ उडू नयेत यासाठी हिरवे मॅट अंथरावेत
अशी सूचना मांडली. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी या वर्षीपासून कृषी प्रदर्शन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी गावात लक्ष दीपोत्सव साजरा करण्यात येईल तसेच हिरवे मॅट मारण्यात येईल
अशी घोषणा केली. दरवर्षी नंदीध्वज मिरवणुकीस उशीर होतो, यावर्षी उशीर होऊ नये यासाठी सर्व नंदीध्वजाच्या मिरवणुका यात्रा कालावधीमध्ये वेळेवर निघावेत अशा सूचना सर्व मानकरी बांधवांना करण्यात आले. यावेळी यात्रा कालावधीत कांतू ख्याडे यांच्यावतीने रांगोळी सेवा देण्यात येईल अशी ग्वाही ख्याडे यांनी दिली
यंदाही सलग पाच दिवस यात्रेच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व जाती धर्मांना, मंद्रूपसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन यंदाचा यात्रा महोत्सव अभूतपूर्व साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीचे प्रास्तविक व सूत्रसंचालन पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केले तर आभार हर्षवर्धन देशमुख यांनी मानले.यावेळी सिकंदर आवटे,
तीन दिवस कृषी प्रदर्शन
मंद्रूपच्या मळसिध्द यात्रेत यंदा दोन ते तीन दिवस कृषी प्रदर्शन भरविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक शेती कसे करावेत,शेतीमध्ये कोणते उपकरणे वापरावेत यासह शेतीमधील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान घेण्याचा संकल्प आहे. तसेच अक्षता सोहळ्या दिवशी लक्ष दीपोत्सव होईल. मंद्रूपसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या यात्रेत तन-मन-धनाने सहभागी व्हावेत असे आवाहन मळसिध्दप्पा यात्रा कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट राजेश देशमुख यांनी केले आहे.

















