तभा फ्लॅश न्यूज/ विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी कृषी मंत्री धनंजय मुडें यांच्यासमोरील अडचणीत वाढ होतच राहिली आहे. मंत्रीपदावर असताना त्यांनी केलेल्या 245 कोटीच्या घोटाळ्याची फाईल त्यांनी गायब केली आहे असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्यांना देण्यात आलेले पत्रही त्यांनी एक्स वर शेअर करीत हा दावा केला आहे.
मुंडे कृषीमंत्री असताना तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. दमानिया यांनी मुंडे सुमारे 245 कोटी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, कृषी साहित्य खरेदीप्रकरणात धनंजय मुंडेंना हायकोर्टात दिलासा मिळाला होता. त्यावर भाष्य करताना धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळाली नसल्याचे दमानिया यांनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा त्यांनी याबाबत राज्य सरकारवर ताशेरे उडताना मुंडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. लोकायुक्तांसमोर सुरू असलेल्या चौकशीची माहिती देताना मुंडेंनी, कृषी सचिव ‘व्ही. राधा’ यांची फाइल गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
Post Views: 8