लोहारा प्रतिनिधी- लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा सद्गुरु वासकर महाराज, श्री शिवराम बुवा दिंडेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच वै ह.भ.प. संत मारुती महाराज कानेगावकर व ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज अचलबेट यांच्या मार्गदर्शनाखाली ७ ते १३ नोव्हेंबर दरम्यान भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे.
या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा, भजन,काकडा, भागवत कथा व हरिपाठ आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठळक आकर्षण: ७ नोव्हें.रोजी ह.भ.प. धनराज महाराज रिंगणीकर, ८ रोजी ह.भ.प. कुलदीप सूर्यवंशी महाराज शिऊरकर, ९ रोजी ह.भ.प. सागर बोराटे महाराज नातेपुते,
१० रोजी ह.भ.प. नितीन जगताप महाराज हिप्परगा कवळी गाणं कोकीळा, ११ रोजी ह.भ.प. संकेत यादव महाराज फलटण ,१२ रोजी ह.भ.प. तुकाराम हजारे महाराज बेळगाव, १३ रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प. गणेश सोनवणे महाराज आळंदी देवाची तर कालावाटप सेवा ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कानेगावकर तरी परिसरातील भाविक भक्तांनी या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळ व हरिहर भजनी मंडळ, मोघा खुर्द यांनी टाळकरी माळकरी वारकरी भजनकरी विणेकरी आदी भाविक भक्तांना केले आहे.




















