गंगापूर / संभाजीनगर – प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गंगापूर, येथे श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळा हजारो सेवेकर्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
सप्ताहमध्ये श्री गणेश याग, स्वामी याग चंडी याग रुद्र याग असे विशेष याग सह, सर्व यज्ञाविधीची सेवा पूर्ण करून सप्ताहाच्या समाप्तीच्या वेळी, श्री सत्यदत्त व सर्व नाम जप करिता उपयोगात आलेल्या पूजेच्या साहित्यांची सांगता पूजा करून सप्ताहाची सेवा पूर्ण करण्यात आली.

या सप्ताह मध्ये एकूण 103 सेवेकरी श्री गुरुचरित्र पारायण करिता बसलेले होते. यात महिलांची संख्या अधिक प्रमाणत दिसून आली. केंद्राचे यंदाचे हे 41 वे वर्ष होते. विशेष गुरुवार असल्याकारणाने श्री स्वामी समर्थ महाराजांना महादेवाच्या रुपात सजवण्यात आले होते. सदर सप्ताहामध्ये विशेष सहकार्य लाभले.
यात, जालना जिल्हा प्रमुख झुंजारराव पाटील काकडे, गंगापूर तालुका प्रतिनिधी गोपीनाथ प्रधान, कर सल्लागार शांतीलाल जाधव , याज्ञनिकी संदीप काटकर, सुभाष कहाटे, सुनीता शर्मा, सुनीता सोळके, सायली धुमाळ, सिंधुताई पाटील, योगेश पाटील, वाल्मीक टेमकर, कमलाकर वखारे, सतीश वाघचौरे, अरविंद लाळे, रमेश आसने, बाप्पा वाडकर, अविनाश पाटील, इत्यादी सेवेकर्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.























