अक्कलकोट – तालुक्यातील नगर पालिका निवडणुकीत महायुती घटक पक्षातील भाजपा विरोधात शिंदे शिव सेना चे नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार एकमेका विरोधात चुरशीने लढले आहेत . भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात तर शिदे शिवसेनेचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वात निवडणुक झाली यामुळे भाजपा मित्र पक्ष यांच्यातच झालेल्या निवडणुकीत कुणाची सरशी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे .
अक्कलकोट ‘ मैंदर्गी , दुधनी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता २ डिसे ला मतदान झाले . गेली १७ दिवसा पासुन लोकांची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे . २१ डिसेंबर कधी उजाडेल याचीच प्रतिक्षा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवारासह लोकाना लागून राहिली आहे . अनेक प्रकारच्या चर्चेनां उत आला आहे . नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचे उत्तर अवध्या काही तासात मिळणार आहे .

अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी भाजपा , कॉग्रेस ‘ , शिंदे सेना , ठाकरे सेना ‘ राष्ट्रवादी शरद पवार या च्या उमेदवरात लढत झाली .
मैंदर्गीत स्थानिक गट विरोधात भाजपा व दुधनीमध्ये नगराध्यक्ष साठी ५ उमेदवार यांच्यात लढत झाली अक्कलकोट नगर पालिकेच्य . नगराध्यक्ष पदासाठी भाजपा चे मिलन कल्याणशेट्टी ‘, कॉग्रेस चेअशपाक बळोरगी ‘ शिंदे सेना कडून रईस टिनवाला ‘ , ‘ ठाकरे सेना बाबासाहेब जाधव राष्ट्रवादी शरद पवार कडून इकरार शेख , अपक्ष नागनाथ उमदी या सहा जणात लढत झाली . नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत. कार्यकर्ते समर्थकात पैजा लागल्या आहेत . अक्कलकोट
नपा च्या २५ सदस्या करिता ७६ उमेदवार भाग्य आजमावित आहेत .
. .शिवसेनेचा धन्युष बाण अचुक लक्ष्य भेदणार का ? भाजपाचे मिलन कल्याणशेट्टी फिक्स नगराध्यक्ष होणार ? दुधनी मध्ये भाजपा चा नगराध्यक्ष होणार की ‘ , शिंदे शिवसेने चा नगराध्यक्ष होणार ? मैंदर्गी न पा मध्ये भाजपा चा नगराध्यक्ष होणार का ‘? ‘ ‘ गटाचा नगराध्यक्ष होण्याची परंपरा कायम राहणार का ? याचा फैसला २१ डिसेंबर ला स्पष्ठ होणार आहे . याची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे .
अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार भाजपा कडून मिलन कल्याणशेट्टी हे निवडणूक लढवत आहेत .
काँग्रेस पक्षाकडून अशपाक बळोरगी हे निवडणूक रिंगणात आहेत. शिंदे शिवसेना गटाकडून रईस तिनवाला हे निवडणूक लढवत आहेत. खरी लढत मित्र पक्ष भाजप विरोधात शिंदे सेना यांच्या तच होण्याची शक्यता आहे कारण २५ नपा सदस्या पैकी १४ सदस्य उभा करू शकला .. शिंदे शिवसेना मैंदर्गी दुधनी अक्कलकोट तीनही नगराध्यक्षपद लढवणार आहे कांग्रेस मैंदर्गी येथे स्थानिक आघाडी सोबत असणार आहे. येथे कॉग्रेस ने उमेदवार दिले नाहीत .दुधनी येथे काँग्रेस नगराध्यक्ष साठी व १३ सदस्य निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत
















