अकलूज – नगर परिषदेची पहिलीच निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली. आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर 26 जागेसाठी सदस्य पदासाठी151 अर्ज अर्ज अखेर प्राप्त झाले आहेत. पैकी महाराष्ट्र विकास सेना पक्ष, काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट व भारतीय जनता पक्ष यांनी आपले उमेदवारांच्या अर्ज दाखल केले आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती दुपारी तीन वाजता कार्यालय कक्षात आलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले रात्री 7/ 45 पर्यंत ही प्रक्रिया चालू होती.
अध्यक्षपदासाठी सुवर्णा अनिल साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट रेश्मा आडगळे व प्रतिभा गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले आहेत भारतीय जनता पक्षाकडून पूजा कोतमिरे वंचित बहुजन आघाडी उमा कांबळे , व उषा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट दिव्यांनी रास्ते अशी साथ नावे नगराध्यक्ष पदासाठी आली आहेत आज भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनीही समूहाने येत आपले अर्ज दाखल केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांनी कोणताही गाजावाजा न करता आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

नगर परिषदेचे पहिले नगरसेवक होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अकलूज ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,तसेच मोहिते पाटील या मातब्बर राजकीय घराण्यातील चौथ्या पिढीतील सयाजीराजे तर माने पाटील कुटुंबातील माजी ग्रा.प.सदस्य ज्योतीदेवी माने पाटील,गिरिराज माने पाटील आदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गिरीश शेटे यांचा नगरसेवक पदासाठी एकमेव अर्ज आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख जयसिंह मोहिते पाटील,किशोरसिंह माने पाटील,ऋतुजादेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, व देवण्या मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचेडॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थितीत होते तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील,माजी आमदार राम सातपुते,सुजयसिंह माने पाटील,आप्पासो देशमुख उपस्थितीत होते. अध्यक्षपदाच्या उमेदवारांची फोटो संपादकांच्या व्हाट्सअप वर टाकले आहेत


















