अक्कलकोट – हर्र बोला हर्र , श्री मल्लिकार्जुन महाराज की जय, श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय, जयचा जयघोष करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत दुधनीचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा भक्तीमय वातावरणात दिव्य भव्य स्वरूपात संपन्न झाला .
दुधनी येथे प्रतिवर्षाप्रमाणे मकर संक्रांतीस ग्रामदैवत श्री सिद्धरामेस्वर यात्रा भरत असते . सदर यात्रा दुधनी विरक्त मठाचे श्री . म नि प्र डॉ शांतलिंगेस्वर महास्वामी जी यांच्या दिव्य सानिध्यात मकर संक्रात सर्व कार्यक्रम होणार आहे. सोमवार रोजी मंदिरात श्री च्या मुर्तीस महाअभिषेक करण्यात आले . त्यानंतर मल्लीकार्जुन मंदिरात मानाच्या नंदीध्वजास नागफणी बांधून सजविले . त्यानंतर मानकरी ईरय्या पुराणीक , चन्नविरय्या पुराणीक , अध्यक्ष चंद्रकांत येगदी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत पुजा करून यात्रेस प्रारंभ झाला आहे .
दुधनीचे ग्रामदैवत श्री महाशिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा अक्षता सोहळ्याला मंगळवारी अपूर्व उत्साह,आनंद, मांगल्य, चैतन्य,आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षा पेक्षा अधिक दिव्य भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पहाटे “श्री ” च्या मूर्तीस अभिषेक करून श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून नंदीध्वजाची मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली.संम्मती कट्ट्यावर डॉ.म.नि.प्र. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरोहित इरय्या पुराणीक व पुराणीक बंधू यांनी विधिवत पूजन संमती वाचन केला.
मंदिरामध्ये ११ ते २ वाजे पर्यत हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये विधिवत अक्षता सोहळा संपन्न झाला. हजारो नयनानी हा नयनरम्य दृश्य टिपला . महिला मंडळीचा देखील मोठा सहभाग यावेळी दिसून आला .
या यात्रेत मोठ्या प्रमाणात कर्नाटक व महाराष्ट्रातील व्यापारी शेतकरी खरेदी विक्री करण्याकरिता मोठया प्रमाणात आले आहेत. त्या अनुषंगान त्यांना कुठल्याही प्रकारची त्रास होऊ नये म्हणून मंदीर पंचकमिटीच्या वतीने जनावारान पाणी , पिण्याचे पाणी व दुधनी येथील सामाजिक संघटनांकडून दररोज भात , वरण वाटप करण्यात येत आहे .
यासोहळ्यास नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, शंकरराव म्हेत्रे ,मंदिर पंचकमिटी चेअरमन चंद्रकांत येगदी, मलकाजप्पा अंधेनी, गिरमलप्पा सावळगी, सातलिंगप्पा परमशेट्टी, सिद्धाराम मल्लाड, लक्ष्मीपुत्र भाईकट्टी, मल्लिनाथ म्हेत्रे , निंगण्णा सोळसे, शरणबसप्पा हावशेट्टी , सचिन माशाळ आदीसह भक्त परिश्रम घेत आहेत .
चौकट –
गाड्डा यात्रेमध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवाची प्रसादसेवा, पशुधनाच्या पाण्याची व्यवस्था व मुलभुत सुविधा देण्यात येणार आहेत . अक्कलकोटसह कर्नाटकातील शेतकरी बांधवानी या यात्रेत आपले पशुधन खरेदी – विक्री करीता आणावे . पशुधनाचे बक्षिस वितरण देखील होणार आहे . सर्वानी गड्डा यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पंचकमिटीच्या वतिने करण्यात आले आहे .
सदर यात्रा सात दिवस भरत असून सोमवार रोजी लिंगास तैलभिषेक . मंगळवार नंदीध्वज मिरवणूक , सम्मती भोगी , अक्षता समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्सवात झाला आहे. बुधुवार दि.१३ रोजi श्री मल्लीकार्जून पालखी , होम पुजाविधी , होम मैदानावर होम प्रदिपन . गुरुवार दि.१४ रोजi श्री एस जी परमशेट्टी प्रशालेच्या मैदानावर शोभेचे दारुकाम व रात्री भजन कार्यक्रम.शुक्रवार दि. १५ रोजी प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्या शनिवार दि.१६ रोजi विविध प्रकारच्या जनावरांची निवड करण्यात येते. रविवार दि.१७ रोजi पशुसर्वधन अधिकारी डॉ दिपक बवंडवे यांच्या उपस्थितीत व डॉ शांतलिंगेस्वर महास्वामी यांच्या हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे . त्यानंतर आठ दिवस जनावरांचा बाजार भरणार आहे . तरी भविकांनी यात्रेस सहभागी व्हावे असे आवाहन देवस्तान पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .


















